एलसीबी सिंधुदुर्ग चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर

१ मे रोजी महाराष्ट्रदिनी ओरोस येथे होणार सन्मानपूर्वक वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : एल सी बी सिंधुदुर्ग चे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर यांना महाराष्ट्र पोलिस महासंचालकांचे उत्कृष्ट सेवेचे पदक जाहीर झाले आहे.१ मे रोजी महाराष्ट्रदिनी ओरोस येथे सन्मानपूर्वक पदक वितरण होणार आहे.गुन्ह्याचा तपास करण्यात माहीर असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर यांना उत्कृष्ट सेवा, गुन्ह्याच्या तपासातील निपुणता आणि दांडगा जनसंपर्क यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पदक जाहीर केले आहे. सिंधुदुर्ग पोलिस दलात एकूण ३२ वर्षे सेवा बजावलेल्या
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर यांनी कणकवली, मालवण, वैभववाडी पोलिस ठाणे तसेच हायवे पोलिस येथे उत्कृष्ट सेवा बजावली आहे. अत्यंत दांडगे नेटवर्क, कुशाग्र बुद्धीने गुन्ह्याची उकल करण्यासाठी पुढाकार घेणे, जनतेसोबत चांगला संपर्क ठेवणे ही राजू जामसंडेकर यांच्या पोलिस दलातील सेवेची वैशिष्ट्ये आहेत. याची दखल घेत राज्यातील सर्वोच्च पोलिस महासंचालक पद जामसंडेकर यांना आज जाहीर करण्यात आले आहे. याबद्दल जामसंडेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!