ओरोस (प्रतिनिधी) : आपल्या वहिनी ला अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी आरोपी प्रवीण बागवे याची ओरोस येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.डी.तिडके यांनी निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ॲड.प्रणिता कोटकर-राऊळ यांनी काम पाहिले.
16 नोव्हेंबर 2018 रोजी फिर्यादीने तक्रार नोंदवली की “दिनांक 15/11/2018 रोजी रात्रौ 8.30 वाजण्याचे सुमारास माझा दिर प्रविण रामचंद्र बागवे हा आमच्या घराबाहेर दारूच्या नशेत आला व त्याने काही कारण नसताना आम्हास शिवीगाळी करू लागला त्यामध्ये तो मला व माझा नवरा यांना शिवीगाळी करीत होता, त्यामध्ये त्याने अतिशय अश्लील शिव्या देऊ लागला. तसेच माझा नवरा यांना शिवीगाळी करून तू बाहेरच ये तुला ठार मारतो. तु जर मुंबईला गेलास तर तीथे येऊन ठार मारणार असे धमकावले.” अशा स्वरूपाची फिर्याद फिर्यादीने दाखल केली होती.
सदर केसकामी आरोपीविरुद्ध भा.द.वि कलम ५०४, ५०६,५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर केसकामी एकूण ४ साक्षीदार तपासले. परंतु सदर आरोपीविरुद्ध ठोस पुरावा आढळून न आल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.












