कटर ब्लेडने छाती,पाठीवर वार | कणकवलीत युवकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : मोटरसायकल अडवून शिवीगाळ का केली याची विचारणा केल्याच्या रागातून भावेश बाळकृष्ण रजपूत ( वय २१, रा. कलमठ गोसावीवाडी ) याच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार करून दुखापत केल्याच्या गुन्ह्यात आकाश शिवाजी निकम (रा.नाथ पै नगर कणकवली), ओंकार किंजवडेकर, हेमंत भोगले ( दोघे रा. हरकुळ बुद्रुक ) यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजता घडली. फिर्यादी भावेश याचा मित्र हिमांशु परब याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भावेश चे मित्र साहिल आणि आर्यन हे केक आणण्यासाठी कणकवली बाजारपेठेत गेले होते. त्यावेळी साहिल आणि आर्यन यांची मोटरसायकल अडवून वरील आरोपी आकाश निकम, ओंकार किंजवडेकर, हेमंत भोगले यांनी शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी आरोपी बसलेल्या ठिकाणी नाथ पै नगर येथील मोकळ्या जागेठिकाणी भावेश आणि सहकारी गेले असता वरील आरोपींनी भावेश च्या छातीवर ,पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार केले. जखमी भावेश याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. आरोपींवर बी एन एस ११५, ११८, ३५२,३५१ (३),१२६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!