खारेपाटण हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश व्हंकळी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण हायस्कूलचे कर्तव्यदक्ष,प्रामाणिक, मनमिळावू व सुशभावी असे शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश व्हंकळी हे ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.३० एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा कार्यक्रम खारेपाटण हायस्कूल येथे नुकताच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर,शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश आकीवटे, शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप, शाळेचे शिक्षक गुरसाळे, कोकाटे यांसह कार्यक्रम प्रसंगी शाळेचे शिपाई प्रकाश व्हकळी यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश व्हंकळी यांच्या प्रशालेतील प्रदीर्घ सेवेबद्दल प्रशालेतर्फे त्यांचा शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना एक भेटवस्तू आठवण म्हणून शाळेच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान प्रकाश व्हंकळी यांनी देखील प्रशालेला आपल्या सेवानिवृत्ती बद्दल वीस हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक सफाई मशीन आठवण म्हणून शाळेला भेट दिली. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व प्रकाश व्हंकळी यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अतिशय कौटुंबिक वातावरणात हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.

error: Content is protected !!