गोपुरी आश्रमाचा 77 व वर्धापनदिन साजरा
कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रम हा तळकोकणातील सामाजिक सुधारणांचा केंद्रबिंदू होता. कोकणगांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचे सामाजिक सुधारणांचे कृतिशील विचार आजच्या जमान्यातही लागू पडत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी व्यक्त केली. गोपुरी आश्रमाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, प्रिया कामत -राव, शिल्पा कामत- पांगेकर, गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष विजय सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विनायक सापळे, मेधा कामत, विनायक मेस्त्री, श्रेयस शिंदे, मयुरेश तिरलोटकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोपुरी आश्रमाच्या आठवणींना उजाळा दिला. गोपुरी आश्रमाला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्यासाठी विश्वस्तांकडून सुरू असलेल्या अभिनव उपक्रमांची स्तुती करतानाच गोपुरी आश्रमाच्या उपक्रमात सहकार्य करणार असल्याचेही सांगितले.














