कळसुली ज्युनि. कॉलेजचा HSC परीक्षेचा १००% निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा HSC बोर्ड परीक्षा २०२५ चा कला व वाणिज्य शाखेचा एकूण निकाल -१००% लागला असून यातील कला शाखेमधून १७ व वाणिज्य शाखेमधून ३० असे एकूण ४७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यात प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.

वाणिज्य शाखा –
प्रथम क्रमांक – कु. आर्या मनोहर तेली ८२.३३%,
द्वितीय क्रमांक – कु. पूर्वा राजेश घाडीगावकर ८२.१७%,
तृतीय क्रमांक – कु. संघवी गोविंद परब ८०. ६७%
कला शाखा –
प्रथम क्रमांक – कु. शुभम सुभाष कदम ६६.३३%,
द्वितीय क्रमांक – कु. विराज राजेंद्र सुतार ६४.००%,
तृतीय क्रमांक – कु. कोमल ज्ञानेश्वर सुतार ६०.३३%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष पुरुषोत्तम सदाशिव दळवी, कार्याध्यक्ष – सूर्यकांत राजाराम दळवी, सरचिटणीस- विजय पांडुरंग सावंत, सल्लागार – प्रकाश दळवी, सर्व संस्था पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी चेअरमन – के. आर. दळवी, व्हाईस चेअरमन – नामदेव घाडीगावकर, सदस्य – रजनीकांत बळीराम सावंत, सदस्या – शुभदा देसाई व सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष – बाबाजी मुरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- शिवाजी गुरव तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!