एच.एस.सी परीक्षेत छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे चे उज्वल यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : एच.एस.सी. परिक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे या प्रशालेने कला शाखेत उज्वल यश संपादन केले.
परीक्षेला एकुण १९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने प्रशालेचा निकाल ९६% लागला आहे. प्रशालेत कु.सिद्धेश यशवंत सुतार याने ७१.८३% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु.वृषभ भिवाजी घाटकर याने ६६.६७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आणि कु.सायली संजय गुरव हिने ६४.८३ % गुण मिळवून कला शाखेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नेर्ले तिरवडे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक जयदीप सुतार यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!