तन्मय सावंत बारावी परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाईन झाला झाला. यात कणकवली तालुक्याचा ९९.२२ टक्के निकाल लागला. तालुक्यातून १९३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यपैकी १९२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालातही विद्यार्थिनींनी बाजी मारली. तालुक्यातील ८ ज्यु. काॅलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. कणकवली ज्यु. काॅलेच्या वाणिज्य शाखेचा विद्यार्थी तन्मय संजय सावंत याने ९४.३३ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. शर्वरी सुहास आजगेकर हिने ९२.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर तन्वी किशोर आरेकर हिने ९०.१७ टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय येण्याचा मान पटकाविला.

तालुका निहाय निकाल
१)कणकवली ज्यु. कॅालेज कणकवली ९९.१ टक्के
२)एस.एस.ज्यु. कॅालेज, कणकवली ८९.५८ टक्के
३)कनेडी ज्यु. कॅालेज १०० टक्के
४)राजाराम मराठे ज्यु. कॅालेज, फोंडाघाट १०० टक्के
५)कासार्डे ज्यु. काॅलेजचा ९९.४५ टक्के
६)वामराव महाडिक ज्यु. काॅलेज ९९ टक्के
७)खारेपाटण ज्यु. काॅलेज ९९.६२टक्के
८)कळसुली ज्यु. कॅालेज १०० टक्के
९)न्यू. इंग्लिश ज्यु. कॅालेज फोंडाघाट १०० टक्के
१०)बीडवाडी ज्यु. कॅालेज १०० टक्के
११)आडियल ज्यु. काॅलेज १०० टक्के
१२)एम. व्ही. मालंडलकर ज्यु. काॅलेज १०० टक्के
१३)आटीआय ज्यु. फोंडघाट १०० टक्के

error: Content is protected !!