संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले संपदा पुजारी चे अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) बोर्ड परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यातील कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील कला,वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेतून एकूण २०७ विद्यार्थी एच.एस.सी. परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत महाविद्यालयाच्या तीनही शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून कु.संपदा यशवंत पुजारी या विद्यार्थीनीने ९३.५०% टक्के गुण मिळवत वैभववाडी तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळाला तिच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे संचालक शरद नारकर व महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एस.नादकर तसेच संपदाचे पालक उपस्थित होते.












