पंचशील विकास मंडळ खारेपाटण ची नवीन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी भरत पाटणकर तर सचिवपदी गर पोमेडकर यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सामाजिक, सांस्कृतिक,शैशणिक व क्रीडा शेत्रात खारेपाटण दशक्रोशित कार्यरत असलेल्या खारेपाटण पंचशील नगर येथील पंचशील विकास मंडळ खारेपाटण (रजि.) मुंबई या मंडळाच्या ग्रामीण शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते भरत रघुनाथ पाटणकर व सचिवपदी सागर प्रभाकर पोमेडकर यांची तर खजिनदार पदी संदेश मधुकर पाटणकर यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाची नुकतीच सर्वसाधारण सभा ” बुद्धविहार ” पंचशील नगर,खारेपाटण येथे मंडळाचे कोषाध्यक्ष संदीप पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेमध्ये मंडळाची सन २०२५ ते सन २०२८ या पुढील ३ वर्षाच्या कालावधीकरिता नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

नव्याने निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे —
अध्यक्ष – भरत रघुनाथ पाटणकर, उपाध्यक्ष – संतोष दत्ताराम तुरळकर,सचिव -सागर प्रभाकर,खजिनदार – संदेश मधुकर पाटणकर पोमेडकर,सहसचिव – भूषण दीपक गोवळकर,खजिनदार – संदेश मधुकर पाटणकर,संदेशवाहक – धीरज जनार्दन जूमलेकर,अमित अशोक पाटणकर,हिशोब तपासनीस – संतोष मधुकर पाटणकर,सल्लागार – संतोष शंकर जुवाटकर

या नूतन कार्यकारिणीचे पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!