महीलांसाठी भव्य लकी ड्रॉ चे आयोजन
विजेत्या महिलांना १०० पैठणी साड्यांचे वाटप होणार
खारेपाटण (प्रतिनिधी) : तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील प्रसिद्ध असलेले ७२ खेड्यांचे देवस्थान श्री देव कालभैरव मंदिराचा ११ वा वर्धापन दीन कार्यक्रम रविवार दी.११ मे २०२५ रोजी धार्मिक तसेच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलासाठी विशेष भव्य लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सहभागी विजेत्या महिलांना सुमारे १०० पैठणी साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण चे अध्यक्ष मधुकर गुरव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
श्री देव कालभैरव मंदिर ११ व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी ८ ते १२ श्री च्या मूर्तीवर अभिषेक पूजा विधी दुपारी १२ ते १ आरती दुपारी १ ते ३ महाप्रसाद सायं. ४ ते १० श्री देव कालभैरव महाराज व श्री देव रवळनाथ महाराजांच्या पालख्यांची नगर प्रदक्षिणा मिरवणूक तर रात्री १०.०० वाजता महिलांसाठी विशेष भव्य लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व ग्रामस्थानी व भक्तांनी रविवारी दि.११ मे २०२५ रोजी होणाऱ्या श्री देव कालभैरव मंदिराच्या ११ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण च्या वतीने करण्यात आले आहे.












