कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख संदेश सावंत आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरेश पाटील यांनी आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची गारगोटी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक मुद्द्यांवर चर्चा झाली. कणकवली व सिंधुदुर्ग परिसरातील आरोग्य सुविधा, स्थानिक रुग्णालयांची गुणवत्ता सुधारणा, तसेच जनतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजनांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला. ही भेट स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली. मंत्री मा. आबिटकर यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यामुळे स्थानिक पातळीवर विविध विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग शिवसेना पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी सदिच्छा भेट











