फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट खैराटवाडी येथील जय मल्हार मित्रमंडळच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या हस्ते राजमाता होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना मनोज रावराणे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनहिताचा कारभार केला. जनतेच्या सुखदुःखाशी समरस होऊन राजमाता होळकर यांनी केलेल्या राज्यकारभारामुळेच त्याना लोकमाता ही उपाधी मिळाली होती. यावेळी मनोज रावराणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या विचारांना उजाळा दिला. यावेळी नवलराज काळे,राजन चिके,सुरेश सामंत,हेमंत फोंडेकर,विश्वनाथ जाधव,मिलिंद लाड,भरत मोरे,बाळू लाड,बाबू शिंदे,प्रज्ञा शिंदे,प्रथमेश सामंत आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.















