रानबांबुळी येथील युवतीचा दुचाकीवरून रस्त्यावर पडून मृत्यू

हुमरमळा राणेवाडी येथील घटना

ओरोस (प्रतिनिधी) : मुंबई गोवा हायवेवरील हुमरमळा राणेवाडी येथे असलेले खड्डे चुकविताना रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकी रस्त्यात पडल्याने झालेल्या अपघातात रानबांबुळी जैतापकर कॉलनी, गणेश नगर येथील सेलीना जॉन फर्नांडिस वय -२८ हीचा मृत्यू झाला आहे. याबाबत दुचाकी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस, वय ३३ वर्ष, राहणार – नेरुर यांच्या विरोधात मयत मुलीचे भाऊ जॉन्सन जॉन फर्नांडिस यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे अंमलदार यांच्याकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार १ जून २०२५ रोजी रात्रौ ८ वाजताच्या सुमारास यातील दुचाकी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस हे आपले ताब्यातील पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच ०७ ए पी ८६५८ ही दुचाकी घेवून ओरोस ते कुडाळ असे जात होते. यावेळी हुमरमळा राणेवाडी येथे रस्त्यात पडलेले खड्डे चुकवीत दुचाकी चालवीत निघून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्यात पडली. यात स्वतः चालक व दुचाकीच्या मागे बसलेल्या सेलिना या मुलीला गंभीर दुखापत झाली. सेलीना जॉन फर्नांडिस हीला उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. परंतु तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात स्वतःच्या व मोटर सायकलच्या पाठीमागे बसलेल्या सेलीना जॉन फर्नांडिस हिला गंभीर दुखापत होवून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सेलिना हीचा भाऊ जॉन्सन जॉन फर्नांडिस यांनी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस याचे विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!