सरपंच ते उद्योजक ही संतोष पारकर यांची घोडदौड कौतुकास्पद – नामदार नितेश राणे
कणकवली (प्रतिनिधी) : अशोक लेलॅंडचे अधिकृत सेवा केंद्र आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहे.हे सेवा केंद्र संतोष पारकर यानी आपल्या जिल्हासाठी अतिशय उपयुक्त प्रकल्प ज्याची आपल्या जिल्हाला गरज होती ती गरज ओळखून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा केंद्र सुरू केले आहे याचा आनंद असून संतोष पारकर याचा सरपंच पासून सुरू झालेला प्रवास आता उद्योजकाकडे घेऊन चालला असल्यामुळे ही घौडदौड अशीच चालू राहावी असे यानिमित्त सांगतो असे कौतुक मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे यानी केले. ते कासार्डे येथे जिल्हातील पहिल्या अशोक लेलॅंड अधिकृत सेवा केंद्र श्री दत्तात्रय मोटर्सच्या उघ्दाटन प्रसंगी बोलत होते.
तत्पूर्वी ना. राणे याच्या शुभहस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून उघ्दाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच तथा श्री दत्तात्रय मोटर्सचे सर्वेसर्वा संतोष पारकर,सौ. सोनल पारकर सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,अशोक लेलॅंड रिजनल रेल्स मॅनेजर सचिन बोंडे,झोनल नेटवर्क मॅनेजर सोहम हेबलकर,एरिया जाबा मलाई,रेटनर सर्व्हीस मॅनेजर अहमद गजाली,भाजपा मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री,विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, माजी जि.प.सदस्य संजय देसाई,बाळा जठार, माजी उपसभापती प्रकाश पारकर,बंड्या मांजरेकर, संतोष कानडे, दारूम सरपंच तेजस्विनी लिंगायत,ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते, तंटामुक्त अध्यक्ष श्रीरंग पाताडे,सोसायटी चेअरमन दिपक सावंत,खरेदी-विक्री संघ संचालक श्रीपत पाताडे, राजाराम कुडतरकर, नारायण घाडी,रविंद्र पाताडे याच्यासह कासार्डेसह व जिल्हातील नागरीक उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. राणे म्हणाले, मी अशोक लेलॅंडच्या अधिका-यांना विचारले असे सेवा केंद्र आजूबाजूला आहे का तेव्हा त्यानी रत्नागिरी शिवाय अजून कुठेच नाही असे सांगितले. यामुळेच जिल्हातील अशोक लेलॅंडच्या डंपरसह अन्य गाड्यांना कोल्हापूरला जायचे आता लागणार नसून या ससर्वांना चांगली सुविधा जिल्हात आता जिल्हातच मिळणार आहे असे सांगत संतोष पारकर व सर्व सहका-यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळेस प्रकाश तिर्लोटकर,सत्यवान केसरकर,सुरेश सामंत,संजय पाताडे यानी मनोगत व्यक्त केली.तर ना. राणेसह उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्य़ात सेवा केंद्र सुरू केल्याबद्दल संतोष पारकर याचा ना.नितेश राणे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जमदाडे यानी केले.












