कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दुस-यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल भगवान लोके यांचा शाल, श्रीफळ देवुन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सचिवपदी निवड झाल्याबद्दल संजय सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी नुतन कार्यकारीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग, पंचायत समिती माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, लक्ष्मीकांत भावे, प्रमोद ठाकुर, संजय कवठकर, रामचंद्र नारकर, पत्रकार संघाचे खजिनदार रोशन तांबे, सहसचिव दर्शन सावंत, तुषार हजारे, संजय बाणे, तुळशीदास कुडतरकर आदी पत्रकार मित्र उपस्थित होते.
कणकवली पंचायत समितीच्यावतीने भगवान लोके यांचा सत्कार











