गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू
न्यूज ब्युराे (अहमदाबाद) : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग ७८७ में प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अहमदाबाद येथून लंडनला निघाले होते, ते नागरी वस्तीवर कोसळल्याने भूमीवरील अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदर मृतांची संख्या वाडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुरुवारी दुपारी बाजून ३८ मिनिटांनी लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले. मात्र, त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांमध्ये ते कोसळले, ते आकाशात ६५० फूट उंचीवर होते, चालकाने शेवटच्या क्षणापर्यंत विमान सुरक्षित उतरविण्याचा प्रयत्न केला. पण तो वाया गेला, अचानक विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हे विमान दिल्लीहून अहमदाबाद व्हाया लंडन असा प्रवास करणार होतं. धक्कादायक बाब म्हणजे उड्डाण करताच अवघ्या 15 किमी अंतरावरच मेघानी रहिवाशी परिसरात विमान कोसळलं आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर आपत्कालीन सेवांवर देखरेख करण्यासाठी चार आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही टीम आरोग्य प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. अपघातस्थळी आणि संबंधित ठिकाणी समन्वित मदत, बचाव आणि वैद्यकीय प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. गांधीनगरहून विमान अपघातस्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तीन तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 90 जवानांचा समावेश आहे. वडोदराहून आणखी तीन तुकड्या पाठवण्यात येत आहेत.











