कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील डामरे वरवचिवाडी येथील भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला 3 मे रोजी मध्यरात्री रात्री 1 वाजता लागलेल्या आगीत 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. 3 मे रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून घरातील सर्व साहित्य फ्रीज, कपाट, टीव्ही, सर्वे कपडे, लाईट फिटिंग, घरातील सर्व धान्य , घरातील भांडी जळून खाक झाली असून अंदाजे 1,85,000/चे नुकसान झालेले आहे. या दुर्घटनेने सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घहटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी केली आहे.
















