कणकवली कॉलेजच्या विद्यार्थिनींची बारावी परीक्षेत दमदार कामगिरी

तालुक्यात प्रतीक्षा पाटील प्रथम, सुकन्या राणे द्वितीय, दिया प्रभूदेसाई तृतीय

कणकवली (प्रतिनिधी) : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कणकवली तालुक्यात कणकवली कॉलेजची वाणिज्य शाखेची कु. प्रतीक्षा संजय पाटील हिने 92.83 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. कणकवली कॉलेजच्या विज्ञान शाखेची कु. सुकन्या संजय राणे हिने 91.67% गुण मिळवित तालुक्यात द्वितीय तर आयडियल इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज वरवडेच्या विज्ञान शाखेची कु. दिया, जयराम प्रभूदेसाईने 91.17% टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय येण्याचा बहुमान मिळवला आहे.

error: Content is protected !!