कॉमर्स शाखेचा राजेश गोसावी ८२.८३ % गुण मिळवून प्रथम
सायन्स व टेक्निकल विभागाचा १०० % निकाल
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. प्रभाकर लक्ष्मण पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज खारेपाटण व तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्यालय द्विस्तरीय व्यवसाय अभ्यासक्रम इर्क्ट्रॉनिक आणि ऑटो टेक्नॉलॉजी इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून खारेपाटण ज्युनियर कॉलेजचा एकूण निकाल ९८.२४ टक्के लागला आहे. तर कॉमर्स शाखेचा विद्यार्थी कु.राजेश चंद्रकांत गोसावी हा ८२.८३ % गुण मिळवून कॉलेज मध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आला आहे.तर सायन्स विभाग व इलेक्ट्रॉनिक व ऑटो या विभागाच्या विद्यार्थ्यांनी १०० % निकालाची परंपरा कायम राखत यश प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२६ एच. एस. सी परीक्षेत खारेपाटण ज्युनियर कॉलेचच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल यशस्वी व गुणवान विद्यार्थ्यांचे खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सर्व संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप व पर्यवेशक संतोष राऊत आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तर १२ वी बोर्ड परीक्षेला एकूण १७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून खारेपाटण ज्युनियर कॉलेजचा एकूण निकाल ९८.२४ टक्के एवढा लागला आहे. तर विविध
शाखा मधून प्रथम क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे —
सायन्स विभाग : या विभागात एकूण ८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले असून या शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम – तेहसीन मुस्ताक अ पटेल (४७८ गुण ७९.६७ %), द्वितीय – ऊकबा अगफार काझी (४५३ गुण ७५.५०%), तृतीय – महाविश इरफान मुल्ला (४४६ गुण ७४.३३%),
कॉमर्स विभाग : या विभागात एकूण ६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा ९७.६० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम – राजेश चंद्रकांत गोसावी (४९७ गुण ८२.८३%), द्वितीय – कु. विद्या मारुती कुडाळकर (४९१ गुण ८१.८३%), तृतीय – कु.व साक्षी विजय शिरकर (४४१ गुण ७३.५०%)
आर्ट्स विभाग : या विभागात एकूण २२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा ९५.४५ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम – दुर्वेश पांडुरंग पवार (३८० गुण ६३.३३%), द्वितीय – प्रतीक नारायण धुरी(३७५ गुण ६२.५०%), तृतीय – कु.आशा बबन पुरीगोसावी(३३८ गुण ५६.३३ %)तर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभागा मध्ये एकूण १४ मुले परीक्षेला बसली होती ही सर्व मुले उत्तीर्ण होऊन या शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून यामध्ये विघ्नेश मुरलीधर शिवणेकर हा विद्यार्थी (३३४ गुण ५५.६७%) मिळवून या शाखेत प्रथम आला आहे. तसेच ऑटो टेक्नॉलॉजी विभागात एकूण २१ मुले परीक्षेला बसली होती ही सर्व मुले उत्तीर्ण झाली असून या शाखेचा १०० टक्के निकाल आहे.तर या विभागातील विद्यार्थी संतोष संस्कार मांडवकर हा (४६१ गुण ७६.८३) मिळवत प्रथम आला आहे.

Durvesh Pandurang Pawar

Rajesh Chandrakant Gosavi

Vidya Maruti Kudalkar

Tahsin Mustak A. Patel

Uqba A. Gafar Kazi

Mahvish Irfan Mulla











