मालवण तालुक्याचा बारावी निकाल ९५.७३ टक्के; वैदेही पालकर तालुक्यात प्रथम

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, मालवण तालुक्याचा एकूण निकाल ९५.७३ टक्के लागला आहे. तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधून परीक्षेसाठी ७५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ५५ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, २२४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर ३५५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली आहे. तसेच ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कट्टा येथील वराडकर कॉलेजच्या वाणिज्य शाखेतील वैदेही सचिन पालकर हिने ५६९ गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. काळसे कॉलेजचा सखाराम विकास गोसावी याने ५५९ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर टोपीवाला वाणिज्य शाखेचा विद्यार्थी निखील नंदकुमार भुर्के याने ५३७ गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक संपादन केला.

दरम्यान, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच वर्दम कॉलेज, पोईप या कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागल्याने संस्थांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!