काळसे ज्युनिअर कॉलेजचा बारावी निकाल टक्के निकाल

सलग 10 वर्षे 100% निकालाची परंपरा कायम

चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे स्व.जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय काळसेचा सन 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाचा बारावीचा निकाल 100% लागला आहे.काळसे कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी सलग दहाव्या वर्षीही 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक – कु. रिया रमेश खोत 77.33 %., द्वितीय क्रमांक- कु. आर्यन संतोष कदम 76.33 %,, तृतीय क्रमांक – कु.दीक्षा पांडुरंग घाडी 75 % यांनी यश संपादन केले आहे. तर कला शाखेतून प्रथम क्रमांक- कु.सखाराम विकास गोसावी 93.71%, द्वितीय क्रमांक – कु. भाविक सुरेंद्र घाडी 52.33 %, तृतीय क्रमांक – कु. कुणाल सुनील हडकर 52 % हे प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झाले आहेत

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विनोद गोसावी व सर्व संस्था पदाधिकारी संचालक, संस्थेचे सल्लागार, माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि काळसे धामापूर गावचे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. आणि पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

error: Content is protected !!