प्रतिक पवार यांच्या काव्यसंग्रहाला दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ गावचे सुपुत्र कवी प्रतिक पवार लिखित आणि हेतकर्स पब्लिकेशन प्रकाशित ‘पुस्तकांना का घाबरतात माणसं…?’ या काव्यसंग्रहाला अल्पावधीतच सलग दुसरा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्राप्त झाला आहे. अक्षरसागर साहित्य मंच, गारगोटी कोल्हापूर यांचा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर नुकताच शिवांजली साहित्यपीठ, चाळकवाडी जुन्नर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी बालसाहित्य संस्था यांचा ‘शिवांजली साहित्य सन्मान सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार’ प्राप्त झाला. सदर पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अल्पावधीतच या काव्यसंग्रहाने महाराष्ट्रातील दोन मानाचे पुरस्कार प्राप्त केले. व नुकतीच या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती वाचकांच्या भेटीला आली आहे. महाराष्ट्रभरातून प्रतिक पवार यांच्या बहुचर्चित काव्यसंग्रहाच्या या यशाचे स्वागत आणि अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!