तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तळेरे ता. कणकवली येथील फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला उजाळा दिला. विज्ञान शाखेत चैताली प्रशांत तेलवेकर हिने ३७७ गुण (६२.८३ टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. श्रावणी संदीप तेलवेकर हिने ३६९ गुण (६१.५० टक्के) मिळवत द्वितीय, तर निशांत विजय घाडी याने ३६८ गुण (६१.३३ टक्के) मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत सागर रवि गावकर याने ४८५ गुण (८०.८३ टक्के) मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. सायली संजय पवार हिने ४३० गुण (७१.६७ टक्के) मिळवत द्वितीय, तर तनिष्का संदीप गावडे हिने ३९८ गुण (६६.३३ टक्के) मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. कला शाखेत खुशी श्रवण पानवाला हिने ३६६ गुण (६१ टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. समीक्षा तारीक हुना हिने ३६० गुण (६० टक्के) मिळवत द्वितीय, तर वेदांत रघुनाथ तानवडे याने ३३४ गुण (५५.६७ टक्के) मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल शंभर टक्के












