मडुरा हायस्कूल मध्ये रंगला ऋणानुबंधाचा स्नेहमेळावा तब्बल 46 वर्षांनी

बांदा (प्रतिनिधी) : “विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील प्रेमाचे ऋणानुबंध अश्या स्नेहमेळाव्याने अधिक वृद्धिंगत होतात. ”असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक बी. एन. तेली सर यांनी केले. ते मडुरा हायस्कूल मध्ये ऋणानुबंधाचा स्नेहमेळाव्यात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी माजी मुख्याध्यापक अन्वर खान सर, पराष्टेकर सर, ज. ला. बांदेकर सर, पांगम सर, पाटील सर, घाटवळ सर, पिळनकर सर, पुराणिक मॅडम, कोरगावकर सर, पाटील सर, नाईक सर आदी उपस्थित होते व मार्गदर्शन केले.

तब्बल 46 वर्षांनी एस. एस. सी. 1979-80 च्या बॅचने आयोजित केलेल्या स्नेहमेळावामध्ये भावनिक नाते व दृढ ऋणानुबंध निदर्शनास आले. विद्यार्थी वय वर्षे 62 ते 65 व गुरुवर्य वय 85 ते 95 वर्ष तरीही उत्साह मात्र बालवयाला लाजवेल असा. वरिष्ठ अधिकारी पदावर, राजकीय उच्चपदावर तथा आपल्या क्षेत्रात उतुंग यश प्राप्त केलेले विद्यार्थी अगदीच लहान बालकासारखे विद्यार्थी म्हणूनच शाळेच्या ओढीने आलेले. गुरु- शिष्य भेटीसाठी आतुरले. यावेळी सर्व गुरुजींना वंदन, औक्षण करून विद्यादेवता शारदामाता पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी मनोगते अगदी भावनिक व गत स्मृतीना उजाळा देणारी होती. तर गुरुवर्य यांचे मौलिक विचारही स्नेहपूर्ण होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावनिक व आपुलकीने भरलेला परशुराम गावडे बॅच चे प्रथम विद्यार्थी यांनी केले. सर्वं गरुवर्य यांचे प्रत्येक विद्यार्थ्याकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुछ, भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमचे महत्व समिती अध्यक्ष आनंद परब यांनी विषद केले. विद्यार्थी मनोगते…लवू गावडे, मुक्ता बागायतकर पुरुषोत्तम पंडित, प्रकाश काकतकर, आनंद परब, सदाशिव गाड यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन नितीन नाईक यांनी केले. तर आभार प्रताप परब यांनी केले. रुचकर स्नेहभोजना नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या स्नेहमेळाव्याला 25 माजी गुरुवर्य व 60 पेक्षा अधिक विद्यार्थी यांनी उपस्थित राहून ऋणानुबंध जपले. शाळेच्याप्रती कृतज्ञता म्हणून आ. मुक्ता बागायतकर यांनी पोडीयम माईक, अनिता पराष्टेकर यांनी कुलर, पुरुषोत्तम पंडित यांनी शारदा मूर्ती, परशुराम गावडे यांनी दहावी विद्यार्थी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी रु. 5000/- आपल्या आईच्या नावाने दिली. तर सर्व बॅचकडून शाळेची गरज म्हणून दोन सिसिटीव्ही कॅमेरा बसवून दिला. तसेंच आजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. हा ऋणानुबंध नेहमी वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी कटीबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. या स्नेहमेळाव्यास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सायली परब मॅडम, शालेय समिती सदस्य, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर व कार्यकारिणी सदस्य यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

error: Content is protected !!