स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फोटो जाळल्याप्रकरणी ऍड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांच्या तक्रारीवरून सर्व आंदोलकांवर आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दिनांक. 3 जानेवारी 2026 रोजी काही आंदोलकांनी बेकायदेशीर रित्या जमाव करून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो जाळले होते तसेच द्वेषपूर्ण उद्गार काढत त्यांचा अपमान केला होता. त्याच दिवशी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले होते. परंतु त्यांच्यावर कुठल्याही गुन्हा दाखल अद्यावत करण्यात आला नव्हता. सदरची घटना होऊन तीन महिने होऊन देखील आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे कोणताही गुन्हा दाखल न केल्यामुळे सदरच्या सर्व आंदोलकांवर देशद्रोह, सामाजिक शांतता भंग करणे, बेकायदेशीर जमाव व क्रांतिकारकांचा अपमान करणे असे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार ऍड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे केली होती. सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व आंदोलकांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम ३५६(१) अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंद क्रमांक- ११६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या पोलिसांच्या कारवाईने आपण संतुष्ट नसल्याचे ऍड. श्रीराम चिंदरकर यांनी सांगितले व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यास व सामाजिक शांतता भंगतेचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी कर्तव्यात कसुर केल्या बद्दल आपण वरिष्ठांकडे दाद मागणार असून तिथूनही कारवाई न झाल्यास न्यायालयीन आदेश घेऊन सर्व आंदोलकांवर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्रातील सिंहाचा वाटा असणारे एक थोर क्रांतिकारी व समाजसुधारक होते ज्यांना ब्रिटिश सरकारने तब्बल ५०-५० वर्षे अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या होत्या व अशा शिक्षा झालेले ते असे एकमेव क्रांतिकारक होते. भारत स्वातंत्र्य व्हावा म्हणून तब्बल ११ वर्षे अंदमान मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगून ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले अशा महान क्रांतिकाराकांची अशी सार्वजनिक ठिकाणी जाणीव पूर्वक अवहेलना करत त्यांच्या प्रतिमा जाळणे म्हणजे भारत देशाच्या एकतेला आणि अखंडतेला बाधा पोहोचवणारे घृणास्पद कृत्य आहे. जर भारत देशा मध्ये भारताचा राष्ट्रध्वज जाळला तर अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो तर ज्या राष्ट्रध्वजासाठी ज्यांनी आपले प्राण वेचले, जीवन त्यागले व संपूर्ण आयुष्य पणाला लावले अशा क्रांतिकारकांच्या प्रतिमा जाळणे म्हणजे राष्ट्रध्वजाच्या अपमानापेक्षा पण घृणास्पद कृत्य आहे आणि अशा क्रांतिकराकांचे फोटो जर भारतासारख्या संविधानिक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पोलिसां सममक्षच जाळले गेले तर ते कृत्य हे देशद्रोहच आहे.

error: Content is protected !!