आकाशा पुढती इथे गगन ठेंगणे sss — मनस्याचा लक्षवेध !

एनसीसी भवन कोल्हापूर येथे १६ जून पासून सुरू होणाऱ्या इंटर ग्रुप स्पोर्ट शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या मनस्या निलेश फालेची निवड —

फोंडाघाट मध्ये मनस्याचे कौतुक!

फोंडाघाट (प्रतिनिधी ) : 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग (ओरोस) येथे सुरू असलेल्या CATC – 314 कॅम्प मध्ये कोल्हापूर ग्रुप अंतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातून IGC (इंटर ग्रुप स्पोर्ट शूटिंग कॉम्पिटिशन) साठी सहभागी झालेल्या 120 कॅडेट्स मधून 29 कॅडेट्स तयार केले जात होते. पैकी 20 कॅडेट्सची या कॉम्पिटिशनसाठी निवड झाली असून,त्यात न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची माध्यमिक विभागाची विद्यार्थिनी मनस्या निलेश फाले हिची JW या गटातून एकमेव निवड झाली आहे.

फेब्रुवारीपासून सुरू असणाऱ्या सरावातून व खडतर गाळण प्रक्रियेतून अचूक लक्षवेध करीत मनस्याची राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली..या यशाबद्दल मनस्यासह मार्गदर्शक शिक्षकांचे, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक, सदस्य, मुख्याध्यापक, तसेच शिक्षक- शिक्षकेतर वर्ग, कर्मचारी,पालकवर्ग यासह फोंडाघाट पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे….

error: Content is protected !!