मणचे गावचे माजी सरपंच बापू गोखले यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी) : मणचे गावचे आधारस्तंभ, माजी सरपंच व माजी देवगड तालुका पंचायत सदस्य मोरेश्वर अनंत गोखले ऊर्फ बापूसाहेब गोखले यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. उमेदीच्या काळात मणचे गाव हेच सर्वस्व मानून गावच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत कार्यरत होते. गावचा रस्ता, पहिली नळ पाणी पुरवठा योजना, ग्रंथालय, हायस्कुलची भागशाळा, सिंधुदुर्ग बँकेची शाखा इत्यादी विकास कामे करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!