वैभववाडी (प्रतिनिधी) : आज महाराष्ट्रात सर्वत्र शाहू महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी दिपप्रज्वलन व शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सक्तीचे प्राथमिक शिक्षण, आरक्षण, शेतीविषयक सुधारणा, कला, क्रीडा क्षेत्राला राजाश्रय अशा अनेक बाबींवर प्राध्यापक शिंदे एस.बी., पाटील एस.एस., प्रभू एन व्ही., यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, वक्ते शिंदे एस.बी., पाटील एस.एस., प्रभु एन.व्ही. सांस्कृतिक प्रमुख जाधव आर.बी., परिट ए.एस. तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.












