गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

लोरे नं 1 सह फोंडाघाट मधील संशयित आरोपीचा गुन्ह्यात समावेश ; इको कारही जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : इको कारमधून बेकायदेशीरपणे ३ वासरांची फोंडयाहून राधानगरी च्या दिशेने वाहतूक करणाऱ्या रमेश विश्राम राणे (वय ३६), विशाल विश्राम राणे (वय ३५), योगेश सुदाम दुखंडे (वय ३४, तिघे रा. लोरे नंबर १,ता. कणकवली) आणि प्रतीक प्रकाश भिसे (वय ३३, रा. फोंडाघाट,ता.कणकवली) या चौघांना फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी पकडले. अधिक चौकशी अंती वरील चारही जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार १४ जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. फोंडाघाट चेकपोस्टवर ड्युटीस असलेलेपोलीस कॉन्स्टेबल महेश फाळके आणि त्यांच्या पथकाने संशयित इको कार क्रमांक ( MH 02 DJ 2639 ) थांबवून तपासणी केली असता, त्यात निर्घृणपणे कोंडलेली ३ वासरे आढळून आली. याप्रकरणी कॉन्स्टेबल फाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रमेश विश्राम राणे (वय ३६), विशाल विश्राम राणे (वय ३५), योगेश सुदाम गुरुखंडे (वय ३४, तिघे रा. लोरे नंबर १) आणि प्रतीक प्रकाश भिसे (वय ३३, रा. फोंडाघाट) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी इको कार आणि वासरांसह मुद्देमाल जप्त केला असून कणकवली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!