एकाच दिवशी ७६ फार्मर आयडीची विक्रमी नोंदणी
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत येथे रविवार १४ जून रोजी चिंदर भटवाडी तलाठी सजा आयोजित फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या कॅम्पला दिवसभरात महसूल गावातील ७६ फार्मर आयडीची विक्रमी नोंदणी करण्यात आली. तलाठी आकाश कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सेवा केंद्र चालक सिध्देश नाटेकर, महसूल सेवक राहुल चव्हाण व गावचे सर्व पोलिस पाटील यांनी सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.










