वैभववाडी (प्रतिनिधी) : वेंगसर सोनारवाडी परिसरात अवैधरित्या गोवा दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी रणजीत दामोदर नार्वेकर वय 38 रा. वेंगसर सोनारवाडी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी १० हजार ८०० रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री ८. ३० वाजता करण्यात आली.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल हरीश जायभाय यांनी फिर्याद दिली आहे.
वैभववाडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भोवड, हरिश्चंद्र जायभाय यांच्या पथकाने वेंगसर सोनारवाडी येथे छापा टाकला. यावेळी सोनारवाडी परिसरात तीन खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या बॉब्स लेमन व्होडका या ब्रँडच्या १८० मि. ली. १४४ सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या, सुमारे दहा हजार ८० रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी रणजीत दामोदर नार्वेकर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












