न्यू इंग्लिश स्कूल हेत येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वैभववाडी (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल हेत येथील माजी विद्यार्थी सन 1992 बॅच आयोजित कै. बाळकृष्ण राजबा फोंडके पारितोषिक योजनेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल हेत येथील एसएससी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, चिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष वसंत खानविलकर मुख्याध्यापक अविनाश कांबळे, श्री पांचाळ, श्री आडे, सौ शिंदे, ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते भाजप कार्यालय प्रमुख अनंत फोंडके, प्राथमिक शिक्षक अनंत फोंडके व स्थानिक कुलकमिटी सदस्य व ग्रामस्थ विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी. तसेच शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी. आणि हायस्कूल उभारणीसाठी ज्या माननीय व्यक्तीने कष्ट केले योगदान दिले ही शिक्षणाची गंगोत्री आपल्या गावात येऊन इंग्लिश स्कूलच्या रूपाने आणली ते माननीय व्यक्तिमत्व काय बाळकृष्ण कोंडके यांचे या निमित्ताने स्मरण करण्यात आले.

error: Content is protected !!