मडुरा येथील व्ही. एन. नाबर शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा

बांदा (प्रतिनिधी) : मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सहशिक्षिका वैलांकनी रॉड्रिग्स यांच्या प्रस्तावने झाली. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर शारीरिक शिक्षिका मयुरी कासार यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनीही त्यात सहभाग घेत योगाभ्यास केला. यावेळी मुलांना ॐ चा योग्य उच्चार कसा करावा, याचे मार्गदर्शनही करण्यात आले.

मुख्याध्यापिका निती साळगावकर यांनी योगावरील श्लोक सादर करत विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला सहशिक्षिका हर्षदा तळवणेकर, स्वरा राठवड तसेच पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

error: Content is protected !!