कणकवली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आव्हानानुसार मोदी@१२ अभियान अंतर्गत कणकवली विधानसभा मधील शहर मंडल -कणकवली च्या वतीने योग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही कणकवली शहर मंडल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. योगासनांच्या फायद्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भाजप च्या वतीने घेतलेल्या पुढाकारातून दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो अशी माहिती देण्यात आली
या कार्यक्रमात……..मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संयोजक मेघा गांगण, गटनेत्या सुप्रिया नलावडे, प्राची कर्पे, उपाध्यक्ष संजना सदडेकर,सरपंच सचीन पारधीये,पपु पुजारे,अभय गावकर,सर्वेश दळवी,विजय चिंदरकर, संतोष गुरव,रोहित घाग आदीं रोटरी क्लब ऑफ कणकवली चे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये रो. ॲड. दीपक अंधारी, रो. गुरूनाथ पावसकर, रो. लवू पिळणकर, उपस्थित होते.
यावेळी योग प्रशिक्षक म्हणून रो. प्रमोद लिमये व रो. संतोष कांबळे यांनी मार्गदर्शन केले, त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला आणि कार्यक्रम ची सांगता केली.












