गुजरात मधील विविध स्थळांच्या दर्शनाला फोंडाघाट बाळ गोपाळ मंडळांचा चमू रवाना !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग पाचव्या वर्षी फोंडाघाट बालगोपाळ मंडळाचा युवा चमू गुजरात मधील, द्वारकाधीश मंदिर, शारदा पीठ, किर्ती मंदिर, सुदामा मंदिर, त्रिवेणी संगम, लाईट साऊंड शो, भालका तीर्थ, नॅशनल पार्क, उपरकोट किल्ला, बुद्धिस्ट लेणी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर,लेसर शो, फुलांची बाग इत्यादी स्थळांना भेटीसाठी आज रवाना झाला. फोंडाघाट बाजारपेठेतील श्री राधाकृष्ण मंदिरात त्यांच्या यशस्वी प्रवासासाठी श्रीफळ वाढवून शुभेच्छा देण्यात आल्या.या सहलीमध्ये सुमारे २३/२५ युवा सहभागी झाले आहेत. यावेळी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता..
गेली चार वर्षे उडपी,नाशिक- त्रंबकेश्वर,अयोध्या वाराणसी, आणि गेल्या वर्षी मथुरा- आग्रा स्थळांना या चमूने भेटी दिल्या आहेत. यावर्षी बालगोपाळांकडून द्वारके मध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारीसस चा जयघोष दुमदुमणार आहे. या ग्रुपमध्ये अतुल कोरगावकर, सिद्धेश पावस्कर, अमित पारकर, आनंद पावसकर, संतोष पारकर, नागेश कोरगावकर, संतोष पेडणेकर, मिथिल सावंत, रोहन पावस्कर, विनोद मोदी, हेमंत म्हापसेकर, सुप्रेश पवार, सिद्धेश मोदी, रितेश माणगावकर,सचिन भोगले, सागर मरिये, यशपाल भोगटे, ओंकार पिळणकर,प्रकाश साळवी,अक्षय कुबडे, मुकेश भोगले, गणेश भुवड ,विवेक आपटे, नंदू उचले इत्यादी युवा सहभागी झाले आहेत.












