भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड होताच आचरा विभाग भाजपाच्या वतीने जल्लोष…!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड होताच भारतीय जनता पार्टी आचरा विभागाच्या वतीने त्रिंबक सापळा येथे फटाके फोडून आणि पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी शक्ती केंद्र प्रमुख समिर बावकर, देवेंद्र हडकर, महेश वरक, दिगंबर जाधव, बाळू वस्त, विलास त्रिंबककर, नागेश साटम, शेखर सुतार, मंदार सरजोशी, संतोष अपराज, संजय लोके, सुबोध गांवकर, भगवान लोके, महेश वायंगणकर, अरुण माने, मधुकर मसुरकर, मंगेश कदम, सोनू त्रिंबककर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!