आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी मालवणचे सुपुत्र आमदार रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या नियुक्ती सोहळ्यास उपस्थित राहून भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांसह मालवणातील भाजपा पदाधिकारी यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी मालवण तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, भाजपा तालुका सचिव तथा नांदोस उपसरपंच विजय निकम, चिंदर तंटामुक्त अध्यक्ष संतोष गावकर, छोटू साटम, विनोद राऊळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












