आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी यापूर्वी वैभववाडी, वेंगुर्ला, देवरुख या पोलीस स्टेशनला चांगली सेवा बजावली आहे. एक उत्तम प्रशासक, कर्तव्यनीष्ठ अधिकारी म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. कणकवली तालुक्यातील जनतेला देखील त्यांच्या उत्तम कार्यातील तत्परता निश्चितच पहायला मिळेल, सर्वसामान्यांना न्याय मिळेल, विविध तपास कार्यात अधिक गती मिळेल आणि गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा खजिनदार हनीफभाई पीरखान, वैभववाडी तालुका उपाध्यक्ष प्रणय बांदिवडेकर, कणकवली तालुका सचिव सदाशिव राणे, सदस्य डॉ.हर्षदकुमार पटेल, भरत तळवडेकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत आदी उपस्थित होते.










