आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याने सिंधुदुर्ग भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाजप मालवण शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज प्रदेश भाजप कार्यालयात भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी बाबा मोंडकर म्हणाले की, मालवणी व्यक्तीची भाजपाच्या राज्य पातळीवर झालेली निवड ही निवड आम्हा कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी आहे. सिंधुदुर्ग भाजपाचा विचार करता रविंद्र चव्हाण यांनी जिह्यात भाजपा शतप्रतिशत करण्यात मोठे योगदान आहे आहे. आज जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत होण्यामध्ये रविंद्र चव्हाण यांचे मोठे योगदान असून त्यांचा निवडीचा सकारात्मक परिणाम मालवण तालुक्यात दिसणार असून अनेक अन्य पक्षाचे नगरसेवक, सरपंच, पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत भाजपमय होईल, असा विश्वास मालवण तालुकाध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला. यावेळी अजित आचरेकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .
नुतन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भाजप मालवण शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिल्या शुभेच्छा











