फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली. संचलित ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै .राजाराम मराठे कृषि महाविदयालय फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदुतांच्या वतीने “ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत” नाद बोअर गोट फार्म या ठिकाणी आफ्रिकन बोअर जातीच्या शेळींचे लसीकरण शिबिर घेण्यात आले.यासाठी “ET+TT” ही लस देण्यात आली. यावेळी फार्म चे मालक निलेश सावंत व राजू चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा कार्यक्रम हर्षद मिटके, प्रसाद पाटील, राकेश आसणेकर, विजय नाईक, निखिल अनूसे, समर्थ वरूटे ,योगेश हाके, संकेत आरडे, सुचित पाटील, अर्जुन सुर्यवंशी या कृषीदुतांनी पार पाडला.यांना महाविदयालयाचे प्राचार्य श्री संते सर व कार्यक्रम समन्वयक मोटे सर,बगाडे सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले..












