श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान डामरे कानडेवाडी येथे गुरुपाैर्णिमा उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान डामरे कानडेवाडी येथे गुरुवार 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ मूर्ती अभिषेक, सकाळी 9 वा. होमवन व धार्मिक विधी, सकाळी 10 वा. गुरुपूजन गुरुवर्य (श्री सावंत बाबा समाधीपूजन), दुपारी 12 वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, दुपारी 12:30 वाजता महाआरती, दुपारी 1 वा.महाप्रसाद, सायंकाळी 5:30 वा. नित्यपाठ वाचन आणि सामुदायिक नामस्मरण सेवा, सायंकाळी 6.30 वा. नित्य सांज आरती, सायंकाळी 7 वा.पालखी आनंद सोहळा, रात्री 8 वाजता महाप्रसाद,रात्री 10 वा. सुस्वर भजने आदी. कार्यक्रम पार पडणार आहेत.

error: Content is protected !!