मेरा युवा भारत आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन मार्फत नित्यनिकेतन सेवा केंद्र सावंतवाडी येथे ‘एक पेड माँ के नाम’

सावंतवाडी (प्रतिनिधी) : दिनांक 07 जुलै, 2025 रोजी सावंतवाडी येथील नित्यनिकेतन सेवा केंद्रात मेरा युवा भारत सिंधुदुर्ग आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन ह्यांच्या माध्यमातून “एक पेड माँ के नाम” हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समीर नाईक, NYK साथी जयराम जाधव त्याचबरोबर पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या संस्थापक साथी फिजा मकानदार व नित्यनिकेतन सेवा केंद्राच्या सिस्टर हेल्टा उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला शुभेच्छा देताना समीर नाईक व साथी जयराम जाधव म्हणाले, की आज वाढत्या जागतिक तापमानामुळे मानवी जीवन धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पर्यावरणाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या संस्थापक फिजा मकानदार यांनी केले. त्या म्हणाल्या, की आज पर्यावरणाची काळजी घेणं, इथले नदी, नाले, डोंगर, झाडे, पशु, पक्षी, प्राणी ह्यांची काळजी घेणं म्हणजे फक्त आपलं कर्तव्य नाही तर ती आपली जबाबदारीपण आहे. त्यांनी पर्यावरणाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पर्यावरण धोरण कसे होते हे नेमक्या शब्दात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साथी कामाक्षी महालकर हिने तर कार्यक्रमाचे आभार साथी भाविका कदम ह्यांनी मानले. या विशेष कार्यक्रमाला रिल स्टार रोहित जाधव उपस्थितीत होते. त्यांनी सांगितले, की आज सोशल मीडियाची ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे निसर्ग आणि पर्यावरण या सगळ्याची जनजागृती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील केली पाहिजे. या कार्यक्रमाला साथी नासिर मकानदार, साथी राकेश जाधव, साथी फातिमा मकानदार, महिन मकानदार, साथी श्रुती सावंत, साथी श्रद्धा परब त्याचसोबत नित्यनिकेतन सेवा केंद्रांच्या अबथोनी ब्रेगेन्झा, सिमरन लोबो, रंजना बोडेकर, भक्ती मेस्त्री, सानिया फर्नांडिस, कनिष्क सम्राट, योगिता पाटील, श्रेया खेस, उज्वला लांबर, अलिरपा लोबो, बबिता वरद, पावलीन डिसोजा इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!