समर्थ आश्रम, विरारफाटा येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

प्रा.आ. केंद्र भाताणे व आशा वर्कर्सचे विशेष सहाय्य

खारेपाटण (प्रतिनिधी) : रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळावे, यासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रम, विरारफाटा येथील एकूण २४ स्त्री-पुरुष बांधवांसाठी भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराकरीता उपकेंद्र कनेर व आशा वर्कर्स यांचे विशेष सहकार्य लाभले.

या शिबिरामध्ये उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक आश्रमवासींची सखोल वैद्यकीय तपासणी केली. रक्तदाब, ताप, हिमोग्लोबीन, मधुमेह, हृदयविकारासंबंधी प्राथमिक चाचण्या तसेच आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्यांचे देखील मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तर काही आश्रमवासीयांना पुढील उपचाराकरीता वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या शिबिराला भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुषमा मुळीक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर या उपक्रमाद्वारे आश्रमातील बांधवांच्या आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष देणे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविणे हा उद्देश साध्य करण्यात आला. जीवन आनंद संस्थेने भाताणे प्रा.आ. केंद्राचे आभार मानून असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संस्थेचा निर्धार असल्याचे सांगितले.

आरोग्य शिबिराच्या संयोजनात ग्रामीण रुग्णालय भाताणे सेंटर येथील मेडिकल टीम डॉ. चांगेश्वरी भताने, CHO – उपकेंद्र कनेर, डॉ. धनंजय एसुठ म्हात्रे, MPW उपकेंद्र कनेर, योगिता अतुल पागी, मायक्रोस्कोपीस्ट PHC भाताणे, उज्वला सानकरे ANM उपकेंद्र कनेर, रुचिता रविंद्र पाटील आशा (सुपरवायजर), वनिता विनोद बरफ आशा (वरठा पाडा), अनिता अनिल धोदड़े आशा (खैरपाडा), वैष्णवी वैभव पवार आशा (टोकरे पाडा पाटील पाडा) यांनी समर्थ आश्रम येथे मेडिकल कॅम्प यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

error: Content is protected !!