नाधवडे विद्यालय परिसरात १०० वृक्षांची लागवड

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नाधवडे येथे वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले.महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ हा उपक्रम हाती घेण्यात आला. श्री समर्थ बैठक वैभववाडी व श्री समर्थ बैठक बांधवाडी यांच्यावतीने नाधवडे येथील अरविंद सावंत सरदार विद्यालय परिसरात १०० वृक्ष लागवड करण्यात आले. वृक्ष लागवडीची श्री सेवा करण्यासाठी स्वयंसेवक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. वृक्ष लागवडीमध्ये आवळा, कांचन, शिवण, जांभूळ, बहावा, करंज अशा १०० वृक्षांची लागवड विद्यालय परिसरात स्वयंसेवकांनी केली. लागवड करण्यात आलेल्या सर्व झाडांचे संवर्धन देखील श्री सदस्यांमार्फत करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रतिनिधींनी सांगितले. या अभियानात अरविंद सावंत सरदार विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे स्थानिक ग्रामस्थांनी कौतुक केले.

error: Content is protected !!