डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पुण्यस्मरणार्थ जिल्हाभर वृक्ष लागवड व संवर्धन अभियान

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,श्रीसदस्यांचा स्तुत्य उपक्रम

तळेरे (प्रतिनिधी) : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येण्याऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे या प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचले आहे. या उपक्रमामधील एक उपक्रम म्हणजे वृक्ष लागवड व संवर्धन आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात देखील नवनवीन औद्योगिक,पायाभूत तसेच आवश्यक सोयीसुविधांचा विकास होत असल्याने वृक्ष तोड होऊन वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढत आहे.जमिनीची धूप होत आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत आहे.वन्य जीव,पशु पक्षी यांची संख्या कमी होत आहे. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. हा समतोल पूर्ववत होण्यासाठी वृक्ष लागवड करून पुन्हा पर्यावरण सुरक्षित करणे गरजेचे आहे.

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान गेली कित्तेक वर्ष वृक्ष लागवड संवर्धन अभियान राबवून समाज प्रबोधन करत आहे कि, प्रत्येकाने दर वर्षी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे. या मोहिमेतूनच दि.०८ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र भूषण ति.डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्यातील देवगड ,कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील एकूण सात ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.यामध्ये श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल,तहलीसदार कार्यालय देवगड,शिरगाव हायस्कूल,दिर्बादेवी मंदिर सांगवे,नवीन कुर्ली वसाहत स्मशानभूमी,कासार्डे पी.एच.सी. ते कासार्डे तिठा दुतर्फा रस्ता आणि अरविंद सावंत माध्यमिक विद्यालय नाधवडे येथे एकूण ६३० वृक्षांची लागवडे करण्यात आली. यामध्ये १४ श्रीबैठकीतील ५३८ श्रीसदस्य सहभागी झाले .या झाडांचे उत्तमरित्या ५ ते ६ वर्ष संवर्धन करून त्या विभागाकडे हस्तांतरित करण्यात येते.

या झाडांसाठी लागणारे खत हे देखील श्रीगणेश विसर्जन दिवशी नदी पत्रात टाकले जाणारे निर्माल्य संकलन करून त्यापासून खत निर्मिती प्रक्रिया केली जाते.जेणे करून जल प्रदूषण होणार नाही व त्यापासून बनलेले कंपोस्ट खत वृक्ष वाढीसाठी उपयुक्त ठरेल.असे पर्यावरण पूरक उपक्रम राबवून प्रत्येकामध्ये सामाजिक बांधीलकीची जाणीव निर्माण करण्याचे काम

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत केल जाते. या कार्यामागे साहजिकच आदरणीय ज्येष्ठ निरुपणकर डॉ.आपासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांनी दिलेले विचार आणि सामाजिक सेवेचा वसा व प्रेरणाशक्ती निश्चितच कारणीभूत आहे.

error: Content is protected !!