वैभववाडी येथील श्रुती लिलेश पटेल सीए परीक्षा उत्तीर्ण

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील श्रुती लिलेश पटेल सीए परीक्षा उत्तीर्ण वैभववाडी पुढारी वृत्तसेवा चार्टर्ड अकाउंटन (सीए) परीक्षेत वैभववाडी येथील कु. श्रुती लिलेश पटेल हीने उज्ज्वल यश संपादन केले आहे. सीए परीक्षा उत्तीर्ण झालेली श्रुतीचे वैभववाडी तालुक्यात अभिनंदन केले जात आहे. वैभववाडी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी श्री लिलेश पटेल यांची ती कन्या आहे. श्रुतीचे दहावीपर्यंतचे शिक्षण वैभववाडी येथे झाले आहे. तर कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजमध्ये तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सध्या ती कोल्हापूर येथेच सीए परीक्षेचा अभ्यास करत होती. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच तिने सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तिने अभ्यासात सातत्य ठेवत परिश्रम घेतले. चिकाटीच्या जोरावर तिने अखेर हे यश संपादन केले आहे. संपूर्ण भारतातून फक्त पाच हजार विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये तिने हे यश संपादन केले या यशाबद्दल तिचे वैभववाडी व्यापारी संघटना पदाधिकारी, व नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!