कणकवलीत अनधिकृत पार्किंगवर वाहतूक पोलिसांची कारवाई

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पटवर्धन चौकात कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पटवर्धन चौकामध्ये अनधिकृतपणे वाहने पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर आज सकाळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक हवालदार विनोद चव्हाण व दिलीप पाटील यांनी ही कारवाई केली. यामध्ये वाहतुकीस अडथळा, दुचाकी वर ट्रिपल सीट, लायसन सोबत नाही, फॅन्सी नंबर प्लेट या च्या 20 केसेस अशा एकूण 16 हजार 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

error: Content is protected !!