सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे निधन

दुपारी साडेबाराला निघणार अंत्ययात्रा

कणकवली (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त वनाधिकारी तथा कणकवली रोटरी क्लब चे संस्थापक सदस्य, सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर ( वय 62 ) यांचे 10 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजता निधन झाले. आज दुपारी 12 : 30 वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहेत.कणकवली रोटरी क्लब सह प्रवासी संघटना, पेन्शनर्स असोसिएशन, जेष्ठ नागरिक सेवा संघ, कणकवली तालुका वैश्य समाज आदी अनेक संघटनांवर ते सक्रीयपणे कार्यरत होते. कणकवली शहरातील सामाजिक ,आरोग्य क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. कोव्हिड काळात स्वतः कोरोनावर मात करून ते आम्ही कणकवलीकर आणि मानवता ग्रुप च्या माध्यमातून समाजसेवेत अग्रेसर होते. एलआयसी विमा प्रतिनिधी प्रशांत कुडतरकर यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चत पत्नी , मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!