सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठाच्या, देवगड येथील शां. कृ. पंतवालावलकर अध्यापक विदयालय अभ्यास केंद्रावरील शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या अभ्यास केंद्रातून जि.प. शाळा आयनल रोहिलेवाडी कणकवली येथील प्राथमिक शिक्षक प्रविण पाताडे यांनी 78.38 टक्के गुणांसह प्रथम येण्याचा मान पटकावला. नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवे कणकवली येथील मुख्याध्यापिका निलम डांगे यांनी 75.63 टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक, तर फोंडा हायस्कूल कणकवलीचे शिक्षक ऋषीकेश खटावकर, कासार्डे हायस्कूल कणकवलीचे शिक्षक अनिल नलावडे व पणदूर हायस्कूल कुडाळचे शिक्षक महेश पाटील यांनी 75 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
2024-2025 हया शैक्षणिक वर्षात एकूण 19 विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 17 विदयार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विदयार्थी उत्तीर्ण झाले, त्यापैकी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत 5 विदयार्थी उत्तीर्ण झाले व प्रथम श्रेणीत 12 विदयार्थी उत्तीर्ण झाले यशस्वी विदयार्थ्यांना शां. कृ. पंतवालावलकर अध्यापक विदयालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र मुंबरकर, प्राध्यापक दत्तात्रय गुलदगड, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण विकास मंडळ देवगडचे सर्व पदाधिकारी व शां. कृ. पंतवालावलकर, अध्यापक विदयालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.











